काँग्रेस-राष्ट्रवादीकडे दमदार नेतृत्वच नाही

Foto
औरंगाबाद : गेल्या दहा ते  पंधरा वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा  शहरात जनाधार घसरला आहे. दमदार नेतृत्वाचा अभाव, राज्याच्या सत्तेत  असतांना शहरवासीयांच्या समस्याकडे पाठ फिरविणे, नवीन नेतृत्वाला चालना न देणे तसेच अंतर्गत लाथाडया यामुळे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही  पक्षांना दमदार उमेदवार मिळविण्यासाठी मोठ्या आवाहनाला सामोरे जावे  लागणार आहे. पाच महिन्या पूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहरातील तीनही मतदार संघात काँग्रेस- राष्ट्रवादी उमेदवारांचे  डिपॉजिट जप्त झाल्याने या पक्षांचे खरे स्वरूप समोर आले.

2014-15 साली  झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला अकरा व राष्ट्रवादीला फक्त चार जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला मिळालेल्या अकरा पैकी सात जागेवर मुस्लिम उमेदवार निवंडून आले तर  राष्ट्रवादीच्या चार पैकी दोन मुस्लिम नगरसेवक झाले. एकूण पंधरा पैकी नऊ जागा मुस्लिमांच्या असल्याने  दोन्ही  पक्षांचा इतर समाजात जनाधारच कमकुवत  असल्याचे स्पष्ट झालं. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पानिपत  झाल्यानंतर ही या दोन्ही पक्षांची नेते मंडळी  स्वबळाची भाषा कोणत्या बळावर सांगताहेत हे अकलेच्या पार आहे. कांग्रेस पर्यवेक्षक मुजफ्फर हुसेन  यांनी शहरातील पदाधिकारी व  कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. बैठकी नंतर हुसेन यांनी महाविकास आघाडी बरोबर सन्मानाने जाऊ नसता स्वबळावर 115 जागेवर उमेदवार देऊ अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली.
आता115 जागेवर उमेदवार आणणार कोठून? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते व आमदार सतीश चव्हाण यांनीही याच भाषेचा प्रयोग केला. राष्ट्रवादी व काँग्रेसकडे  115 वॉर्डात इच्छूक उमेदवारांचा दुष्काळ आहेत तर दुसरी कडे शिवसेना, भाजप व एमआयएम पक्षांची कार्यालय चोवीसतास   हाउसफुल्ल आहे. खासदारकी मिळविण्या नंतर एमआयएम तब्बल ऐंशी जागांवर निवडणूक लढविण्याच्या तय्यारी केली  आहे. गेल्या पालिका निवडणुकीत 52 जागेवर उमेदवार देत पंचवीस जागा  जिंकणार्‍या एमआयएम कडे एका वार्डासाठी तीन ते पाच उमेदवार उभे आहेत. तिच परिस्थिती सेना- भाजपची आहे.

2014 विधानसभा निवडणुकीत कांग्रेसचे मंत्री  राजेंद्र दर्डांचा दारुण पराभव व शहरात  एमआयएमचा उदय या दोन्ही घटना शहरातील राजकारणाला कलाटणी देणार्‍या आहे. त्या नंतर काँग्रेस राष्ट्रवादीला अच्छे दिन दुरून डोंगर  साजरे  सारखे झाले. साडेचार वर्ष नंतर काँग्रेस राष्ट्रवादी राजकीयरित्याजिवंत होणार असं वाटत असतानाच लोकसभा निवडणुकीत एमआयएमने  उडी घेऊन बाजी मारली. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार सुभाष झांबड यांचे डिपॉजिट जप्त झाल्याने पक्षाची नाचक्की झाली.शहरात काँग्रेसचा परंपरागत दलित मुस्लिम मतदार आता निसटल्यातच जमा आहे. मुस्लिम मतदार एमआयएमकडे  तर दलित मतदार वंचित आघाडी कडे गेल्याने  काँग्रेसची  परिस्थिती ’ना घर का ना घाट का जैसे झाली आहे. राष्ट्रवादीची थोडे फार मराठा व मुस्लिम मतदारावर मदार असली तरी त्यांना यश  मिळवून देण्यास पुरेसे नाही.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker